Breaking News

अषित प्राथमिक शाळा पवनी येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती संपन्न.

 अषित प्राथमिक शाळा पवनी येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती संपन्न.

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, पवनी :- थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची १९६वी.जयंती‌ अषित प्राथमिक शाळा पवनी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक आर.व्ही.बिसने यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्वांनी अभिवादन केले.यानंतर‌ शाळेतील उपक्रमशील शिक्षक ए.आर.गिरी‌ यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या जिवनकार्यावर आधारित विविध प्रकारची माहिती दिली तसेच त्यांनी केलेले शैक्षणिक व सामाजिक कार्य याविषयी सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी देखील महात्मा फुले यांचा आदर्श निर्माण करुन आपली शैक्षणिक प्रगती करावी असे मोलाचे मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक यांनी केले.अशाप्रकारे उत्स्फूर्त वातावरणात महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक पी.डी.भोयर,एम.एम.जिवतोडे, सुप्रिया रामटेके, धनश्री मुंडले, प्रमिला बिसने तथा शालेय विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.

२ टिप्पण्या: